Saturday, August 29, 2026
BusinessLatest News

सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा १,२०० कोटी रुपयांचा राइट्स इश्यू

 इश्यू पिरियड बंद होताना इश्यू १.८ पटीने झाला ओव्हरसबस्क्राइब

  • आमच्या कंपनीचे प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्याचे २४० कोटींचे अंशतः पेड-अप इक्विटी शेअर्स रुपये ५ प्रति राइट इक्विटी शेअर (प्रति राईट इक्विटी शेअर ३ रुपये च्या प्रीमियमसह) च्या किंमतीवर रोख रकमेसाठी कंपनीच्या पात्र इक्विटी भागधारकांना राइट्स आधारावर १,२०० कोटी रुपयांपर्यंत एकत्रित करणे याची आज यशस्वी सांगता
  • इश्यू १.८ पटीने झाला ओव्हरसबस्क्राइब

 

मुंबई, २० ऑक्टोबर २०२२: क्षमतेनुसार पवन घटक उत्पादन विभागातील भारतातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आणि क्षमतेनुसार भारतातील सर्वोच्च नूतनीकरणक्षम O&M सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या सुझलॉन एनर्जी लिमिटेडने (स्रोत: CRISIL अहवाल) ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सादर झालेल्या पात्र इक्विटी भागधारकांसाठी (“राइट्स इश्यू”) राइट्स आधारावरील २४० कोटीच्या  अंशतः पेड अप इक्विटी शेअर्सच्या इश्यूची यशस्वीरित्या सांगता झाल्याचे आज जाहीर केले.

इश्यूमध्ये १.८ पट ओव्हरसबस्क्रिप्शन होत ४३५.४६ कोटी शेअर्सचे* सबस्क्रिप्शन झाले. इश्यू कालावधी ११ ऑक्टोबर २०२२ ते २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत होता.

इश्यूचा आकार २४० कोटींचे अंशतः पेड-अप इक्विटी शेअर्स रुपये ५ प्रति राइट इक्विटी शेअर (प्रति राईट इक्विटी शेअर ३ रुपये च्या प्रीमियमसह) च्या किंमतीवर रोख रकमेसाठी कंपनीच्या पात्र इक्विटी भागधारकांना राइट्स आधारावर १,२०० कोटी रुपयांपर्यंत होता. त्यासाठीचे गुणोत्तर पात्र इक्विटी भागधारकांकडे असलेल्या प्रत्येक २१ पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्ससाठी ५ राईट्स इक्विटी शेअर्स असे होते.

राइट्स इश्यूद्वारे जमा झालेला निधी वेगवेगळ्या कॉलमधील आहे – अर्जाच्या वेळी प्रथम कॉल ६०० कोटी रुपये आहे. ज्याचा वापर ऑफर पत्रामध्ये वर्णन केलेल्या पद्धतीने केला जाईल. त्यामध्ये कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या काही थकित कर्जाच्या काही भागाची परतफेड किंवा मुदतपूर्व-पेमेंट समाविष्ट आहे.

बीएसई आणि एनएसई वर नवीन शेअर्सचे वाटप आणि सूचीकरणाची औपचारिकता नोव्हेंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या अधिकार इश्यूसाठी मध्यस्थ: इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड – इश्यूचे लीड मॅनेजर, एस अँड आर असोसिएट्स भारतीय कायद्यानुसार कंपनीचे कायदेशीर सल्लागार, इंडस लॉ – भारतीय कायद्यानुसार लीड मॅनेजरचे कायदेशीर सल्लागार आणि इंडसइंड बँक लिमिटेड – बँकर टू द इश्यू.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading