“दिवाळीला काळजीपूर्वक फटाके वाजवा,” – अभिनेत्री श्रद्धा रानी शर्मा
ग्लॅमरस, सेक्सी आणि प्रतिभावान अभिनेत्री श्रद्धा रानी शर्मा यावेळी मुंबईतील तिच्या घरी दिवाळी साजरी करणार आहेत.यावेळी ती अनाथाश्रमात जाऊन दिवाळीनिमित्त लोकांना भेटवस्तू आणि देणगी देणार आहे.असं ती नियमितपणे अनाथाश्रमात जाऊन लोकांना मदत करते.एकदा, दिवाळीच्या निमित्ताने खूप वर्षांपूर्वी ती फिल्मसिटीमध्ये ‘हर साक पे उल्लू बैठा है’ या मालिकेचे शूटिंग करत असताना, तिनेत्यानंतर सेटवर मोठी लड (फटाकडी) पेटवण्यात आला.त्यामुळे सेटवरील सर्व पोशाख पेटले होते आणि सेट वर मोठा गोंधळ झाला.याबद्दल श्रद्धा रानी शर्मा म्हणते, “मी लोकांना सांगू इच्छिते की, दिवाळीत फटाके काळजीपूर्वक वाजवा, नाहीतर मोठा अपघात व्हायला वेळ लागणार नाही आणि पर्यावरणाचे भान ठेवून फटाके कमीत कमी वाजवा.त्यापेक्षा गरीब माणसाला मदत करा.सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा.”
