जेंव्हा अजित पवार यांच्या पत्नी खरदीचे पैसे देण्याचा हट्ट धरतात
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अनेक कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि अनेक गमती देखील अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात करताना दिसतात. पण आज पुण्यात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं एक वेगळच रूप पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पुण्यातील यशश्री सखी समूहाच्या दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शन आणि विक्रीच्या उद्घाटनाला आल्या होत्या.
उद्घाटनानंतर सुनेत्रा पवार या प्रदर्शनाची पाहणी करत असताना त्यांना एक पूजेची वस्तू आवडली आणि त्यांनी ती घेतली सुद्धा. यात आरतीचा काचेचा सेट आणि काचेचे दोन दिवे यांचा समावेश होता. त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्यांना ते घ्या असे सांगितले. आणि लगेच त्यांचा स्टॉल होता त्यांना पैसे किती झाले असे विचारल. पण तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी आणि स्टॉल वाल्यांनी ताई पैसे नको असं सांगितलं. पण त्यांच्या या विधानाला सुनेत्रा पवार यांनी लगेच नकार देत जर तुम्ही पैसे घेतले तरच मी हा सेट खरेदी करेल असा हट्ट धरला. आणि त्यांनी त्या वस्तूची पूर्ण किंमत देऊनच ती वस्तू खरेदी केली.
