Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजअखेर ३ अर्ज दाखल

मुंबई  : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading