…तर मंत्रालयासमोर 20 ऑक्टोबर ला खर्डा -भाकरी आंदोलन करणार -अतुल खूपसे पाटील
पुणे : प्रत्येक खात्यात दीपावलीला बोनस दिला जातो. परंतु 24 तास जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांची दीपावली कडू करण्याचा डाव सरकारचा आहे. म्हणून पोलीस बांधवांना बोनस दिला जात नाही. पोलिसांना त्वरित एक महिन्याची पगार दीपावली बोनस म्हणून देण्यात यावी. नाहीतर मंत्रालयासमोर 20 ऑक्टोबर रोजी खरडा भाकरी खाऊन जनशक्ती संघटना आंदोलन करणार. अशी माहिती जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
जनशक्ती संघटनेच्या मागण्या
१)पोलिसांना दीपावलीला एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात यावा.
२) सुट्टीच्या दिवशी काम केले तर त्यांचा पगार मिळाला पाहिजे.
३)इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आठवड्यातून एक सुट्टी मिळावी.
४)पोलीस बांधवाला स्वतःचे घर बांधायचे असेल डीजी लोन शिवाय पर्याय नाही.डीजी लोन सारखेच इतर बँकांकडून पोलिसांना लोन मिळावेत.
५) पोलिसांना अनेक आजार होतात काही आजार हे पोलीस प्लॅनमध्ये बसत नाहीत. ते आजार पोलीस प्लॅनमध्ये बसावेत.
६) ग्रामीण भागातील पोलिसांच्या घराची अवस्था दयनीय आहे. पोलिसांना चांगली घरे मिळावेत.
७) पोलिसांना प्रवास भत्ता मिळावा.
८) महिला पोलिसांच्या बाबतीत त्यांच्या घराच्या जबाबदाऱ्या सुद्धा लक्षात घेऊन ड्युटीचे स्वरूप व पोस्टिंग देण्यात यावे.
९) कोरोना काळात पोलिसांनी सर्वात पुढे जाऊन काम केले . त्यासाठी त्यांना विशेष मानधन द्यावे.
१०) सर्वसाधारण बदल्या तात्काळ कराव्यात.
