होंडा रेसिंग इंडियाचे राजीव सेतु आणि सेंथिल कुमार यांनी एआरआरसीच्या चौथ्या फेरीच्या दुसऱ्या फेरीत मिळवले आणखी पॉइंट्स
सेपांग इंटरनॅशनल सर्किट (मलेशिया),– एफआयएम एशिया राउंड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) २०२२ च्या सेपांग येथे झालेल्या उपांत्य फेरीत सहभागी झालेल्या होंडा रेसिंग इंडिया या एकमेव भारतीय टीमच्या रायडर्सनी या फेरीत एकूण ११ पॉइंट्स मिळवले.
लीडरबोर्ड सातत्याने हलता ठेवणारे आणि एरवी ग्रिडवर १४ व्या स्थानावरून सुरुवात करणारे भारताचे अनुभवी रायडर राजीव सेतु यांनी कालच्या रेसनंतर आज १६ व्या स्थानावरून सुरुवात केली, तर आज त्यांनी १६ व्या स्थानावरून सुरुवात केली. मात्र, मायदेशातील रेसिंगचा आतापर्यंतचा अनुभव आणि कालच्या रेसमधून मिळालेले धडे याच्या जोरावर राजीव यांनी वेगाने प्रगती करत ११ व्या स्थानावर रेस संपवली आणि ५ पॉइंट्स मिळवले. या फेरीनंतर त्यांनी ८ पॉइंट्स समाविष्ट करत एकूण ३२ पॉइंस जमा केले.
टीममधील सहकारी सेंथिल कुमार यांनीही ८ व्या लॅपमध्ये आघाडी घेतली. राजीव यांच्याप्रमाणे सेंथिलही रेसच्या सुरुवातीला १६ व्या स्थानावरून १८ व्या स्थानावर गेले. आपल्या सहकाऱ्याच्या पावलावर पाऊल टाकत सेंथिल यांनीही प्रगती करत बाकीच्या आंतरराष्ट्रीय रायडर्सना मागे टाकत रेस १३ व्या स्थानावर संपवली आणि ३ पॉइंट्स मिळवले.
कालच्या पहिल्या रेसमध्ये ३ पॉइंट्स आणि आजच्या दुसऱ्या रेसमध्ये ८ पॉइंट्स मिळवल्यानंतर होंडा रेसिंग इंडिया टीमने ११ पॉइंट्ससह चॅम्पियनशीपच्या चौथ्या फेरीची सांगता केली.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. प्रभ नागराज आजच्या रेसविषयी म्हणाले, ‘मलेशियातील वीकेंडची आम्ही चांगल्या प्रकारे सांगता केली. या प्रदेशातील काही सर्वोत्तम रायडर्सचा पाठलाग केल्यानंतर राजीव आणि सेंथिल या जोडीनं कडवी झुंज देत ११ पॉइंट्ससह आजच्या फेरीची सांगता केली. आम्ही आमच्या उणीवांवर काम करून आणखी सुधारणा करू. बुरीराम येथे अंतिम फेरी होणार असून मला विश्वास आहे, की आम्ही या फेरीत अधिक चांगली कामगिरी करू.’
होंडा रेसिंग इंडिया रायडरराजीव सेतु म्हणाले, ‘कालच्या रेसमध्ये मी ट्रॅकवर उतरलो तेव्हा माझा मुख्य भर आपण कुठे मागे पडतोय याचे विश्लेषण करण्यावर होता. आजच्या कामगिरी मी खूष आहे, कारण मला सर्व योग्य धोरणांची अमलबजावणी करता आली. मी स्वतःची शैली आणि सोयीनुसार रायडिंग केले. टीम आणि देशांसाठी ८ पॉइंट्स मिळवल्याचा मला आनंद वाटतो. अंतिम फेरीमध्ये सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आशा आहे.’
इदेमित्सु होंडा रेसिंग इंडियाचे रायडर सेंथिल कुमार म्हणाले, प्रत्येक रेसगणिक मी आणि मशिनमधला ताळमेळ वाढत आहे. आजच्या रेसमध्ये मी माझे सर्व लक्ष आणि उर्जा ट्रॅकवर सर्वोत्तम कामगिरी करण्यावर केंद्रित केले. १३ वे स्थान आणि मिळालेले पॉइंट्स माझ्या प्रयत्नांची साक्ष देतील. यापुढेही अशीच चांगली कामगिरी करण्याचा मला विश्वास वाटतो.
