रक्तदान शिबीरात 117 जणांचे रक्तदान
पुणे : गोदाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे शहर कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद दादासाहेब रणपिसे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तव्यपूर्ती वाढदिवस सप्ताह कार्यक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबीरात 117 कर्मचार्यांनी रक्तदान केले. सह्याद्री हॉस्लिटल केंद्राच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन लुंबीनी बुध्द विहार स.नं.26 बोपोडीे येथे केले होते. यावेळी पुणे शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, दत्ता बहिरट, मनिष आनंद, रमेश पवळे, राजेंद्र भुतडा, कैलास आरुडे, इंद्रजित भालेराव, प्रशांत टेके, विशाल जाधव, कैलास गायकवाड, सुदरताई ओव्हाळ, कांताताई ढोणे, विमल खांडेकर, इंदुबाइृ गायकवाड, मनिषाताई ओच्हाळ, ज्योती परदेशी, विनोद दादासाहेब रणपिसे आदी उपस्थित होते.
