Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

वडगावशेरीतील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची आयुक्तांशी भेट

पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक‘म कुमार यांची आज भेट घेतली.
मुळीक म्हणाले, “गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या विविध विकासकामांच्या संदर्भात नागरिकांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयात सूचना आणि तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयुक्तांशी सकारात्मक चर्चा केली. वडगावशेरीतील विविध भागातील रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना, समान पाणीपुरवठा, पावसामुळे पाणी साठणार नाही यासाठी दक्षता, गोल्फ चौक उड्डाण पूल सद्यस्थिती, महापालिका दवाखान्यातील सद्यस्थिती आणि उपाययोजना तसेच महापालिकेच्या शाळांना वर्गखोल्या उपलब्ध करून देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading