Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात यंदाही सरासरीपेक्षा २३ टक्के जास्त पाऊस पडला

पुणे: राज्यात यंदाही सरासरीपेक्षा २३ टक्के जास्त पाऊस झाला आहे. यंदा जूनमधील अतिरिक्त पावसाने राहिलेली उर्वरित तीन महिन्यांतील तूट भरून काढली असून, पावसाळ्याच्या चार महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा अतिरिक्त बरसला आहे. राज्याची सरासरी ९९४.५ असताना, ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात १२१९.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, येथे सरासरीच्या तब्बल ६१ टक्के जास्त पाऊस झाला आहे; तर सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी झाला आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्याचा विचार करता, विदर्भात सर्वाधिक ३१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २६ टक्के, मराठवाड्यात २४ टक्के, तर कोकणात ९ टक्के, तर जास्त पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, येथे सरासरीच्या तब्बल ६१ टक्के जास्त पाऊस झाला आहे; तर मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात ४६ टक्के जादा झाला आहे; तर हिंगोलीत सरासरीच्या ११ टक्के कमी झाला आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात ३३ टक्के जादा पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे.
राज्यातील सर्व उपविभागांमध्ये सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात या महिन्यात सरासरीच्या तुलनेत ३० ते ४५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. १ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस झाला असून, ही सरासरी १७२.५ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात २५९.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
२०१९ नंतर राज्यात सलग चौथ्यावर्षी मान्सून अधिकचा बरसला आहे. राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी मान्सून पाऊस ९९४.२ मिलिमीटर असतो. २०२१ पर्यंत गेल्या तीन वर्षांत राज्यात पावसाळ्यात ११७६ ते १३६० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदादेखील हा पाऊस १२१९.७ मिलिमीटर झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading