fbpx

पोषण आहाराचे महत्व पटवून देऊन ते प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम – आमदार सुनील टिंगरे

पुणे : एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून माता तसेच बालकांची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याचे काम सुरू आहे. सुदृढ व निरोगी माता तसेच बालकांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषण आहाराचे महत्व पटवून देऊन ते प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेच्या माध्यमातून सुरू असल्याचे मत आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केले.

एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत दापोडी बोपोडी विभागाच्या वतीने लोहगाव बीट पोषण अभियानाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार टिंगरे बोलत होते.पोषण आहाराची जनजागृती व प्रबोधन अत्यंत प्रभावी माध्यमातून करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या अंतर्गत सुरू असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाला मुख्यसेविका शुभश्री घटमाळे उपस्थित होत्या.
सेविकाताई व मदतनीसताई तसेच बीट मधील महिला यांनी बनवलेल्या पौष्टिक पदार्थ व पाककृतींचे प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते. याच कार्यक्रमात सेविका व मदतनीस यांनी आहार ,आरोग्य, शिक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर गाणी व पथनाट्य देखील सादर केले. या कार्यक्रमात आहार मनोरा, पोषण आहाराची माहिती देणाऱ्या रांगोळ्या, बेबीकेअर किट, पूर्व शालेय शिक्षण साहित्य याचा समावेश आयोजित प्रदर्शनामध्ये होता.
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या वतीने आहार आरोग्य विषयक “पपेट शो” सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. संचालन नीलिमा चांदेरे यांनी तर आभार मनीषा खरात यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: