Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

लोकमान्य टिळकांच्या ‘ गणेशोत्सवाची प्रेरणा’ ही इंग्रजविरोधी जनआंदोलनाच्या बळकटी साठी – डॉ. सदानंद मोरे

पुणे – “सामर्थ्य आहे चळवळीचे’, जो जे करेल तयांचे..!
तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहीजे”…!! या संत शिकवणुकी नुसार भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, स्वातंत्र्य चळवळीस ईश्वर-रूपी, विवेकाचे अधिष्ठान मिळण्या करीता, तत्कालीन जूलमी राज्यकर्ते इंग्रजां विरोधी जनआंदोलनाचा रेटा तीव्र करण्याकरीताच, लोकमान्य टिळकांनी, भारतीय जनतेस ‘सार्वजनिक गणेशोत्सवाची’ प्रेरणा दिली.. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते व जननायक हे तत्कालीन काँग्रेस नेते लोकमान्य टिळक आहेत, असे वक्तव्य ‘संत साहीत्याचे गाढे उपासक’ व जगदगुरू तुकाराम महाराजांचे वंशज डॅा सदानंद मोरे यांनी सदाशिव पेठेतील नवजवान मित्र मंडळाच्या ‘सुवर्ण महेत्सवी’ वर्षाच्या श्रीं च्या प्राणप्रतिष्ठा स्थापने प्रसंगी केले..!!
मंडळाचे कार्याध्षक्ष बाबा कंधारे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम सांगितले व देखाव्याचे ऊदघाटन शुक्रवारी होणार असल्याचे सांगितले..!
डॅा सदानंद मोरे, काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, माजी विरोधीपक्ष नेते, त्र्यंबक आपटे सर, मंडई मंडळाचे कार्यध्यक्ष भोला वांजळे, व मंडळाचे कार्यघ्यक्ष बाबा कंधारे यांची भाषणे झाली..
या प्रसंगी, मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपटे सर, गोपाळदादा तिवारी तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष बाबा कंधारे, अध्यक्ष चंद्रकांत केळुसकर, आशुतोष धोडमिसे, बाळासाहेब केळुसकर, कैलास गुप्ता, संदीप कोकाटे, अभय केसकर,गुरुदेव कोकाटे,मिलिंद माने,नचिकेत बेरी,संजय जाधव,सिद्धेश जाधव,आदित्य राऊत,प्रसाद गाढवे,आदित्य खोपडे,अर्पित कंधारे, वडगे,योगेश आमराळे,नाना जाधव,अमेय गहिने,आदिनाथ कंधारे,ओम जाधव,स्वराज कोकाटे ,राजेश जाधव,प्रसाद कोकाटे,सचिन देशमुख,मंदार कोकाटे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading