Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

चंद्रकांत पाटलांचा ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर विना हेल्मेट प्रवास

पुणे: देशभरात गणेशोत्सवाची धूम असून विशेषत: महाराष्ट्रातून सुरुवात झालेल्या या उत्सवात यंदा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या २ वर्षानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असून सर्वच जण मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते गल्ली-बोळातील बाल-गोपाळांपर्यंत गणपतीच्या आगमनाची, मंडळांच्या गणरायाची लगबग पाहायला मिळत आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यातील मानाच्या गणपतीस्थळी सहभागी होत बाप्पांचे दर्शन घेतले. मात्र, ट्रॅफिकमुळे त्यांची गोची झाल्याचं दिसून आलं.

पुण्यातील रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून चंद्रकांत पाटील यांनी एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला. मात्र, दुचाकी वाहनावरुन विना हेल्मेट प्रवास केल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियातून टिका होऊ लागली आहे. जर मंत्री विना हेल्मेट प्रवास करत असतील तर. सामान्य नागरिक विना हेल्मेट प्रवास करणार का. पोलीस प्रशासन याकडे लक्ष देणार का असे प्रश्न उपस्थित होत आहे.

 

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील वेगवेगळ्या गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यातील गर्दी’ला पर्याय म्हणून ट्राफिक पोलिसाचा आधार घेतला. मात्र पोलिसांनीच हेल्मेट घातलं नसेल आणि नियमांचे उल्लंघन केले असेल तर कायद्याचा गैरवापर लोकप्रतिनिधी सह पोलीस प्रशासन सुद्धा करत आहे. बेकायदेशीर शिस्तीचे हे पुण्यातील चित्र गंभीर आहे. 

– संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading