fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो हे पूर्ण राज्याला माहित आहे -सचिन अहिर

पुणे : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवाजी पार्कवरील हा दसरा मेळावा होणार की नाही आणि झाला तर तो ठाकरे गट घेणार की शिंदे गट घेणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.दोन्ही बाजूंकडून दसरा मेळावा आमच्याच पक्षाचा होणार, अशी वक्तव्ये करण्यात येत आहेत. त्यावर मुंबईत दसरा मेळावा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो.हे पूर्ण राज्याला माहित असल्याचे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार सचिन अहिर यांनी आज पुण्यात शिवसेनेतर्फे भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज पुणे महापालिकेच्या येथे आंदोलन करण्यात आले. तेव्हा त्यांनी पत्रकारांना माहिती देताना शिंदे गटाला इशारा दिला.

सचिन अहिर म्हणाले,दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होतो आणि शिवसेनेचाच होणार. दावे करतात त्यांच्यात दसरा मेळावा घेण्याची हिम्मत आहे का.असे आव्हानच त्यांनी शिंदे गटाला दिले .
शिंदे गटातील आमदार कधी निवडणूक होऊ दे आम्ही जिंकून येऊ असे. असे म्हणत आहेत. त्यावर सचिन अहिर म्हणाले,जे नेते आपल्या स्वार्थासाठी वारंवार इकडे तिकडे करत होते त्यांना माझा आव्हान आहे की, आमचा जिल्हाप्रमुख पाठवतो त्याच्यासमोर निवडून या, असे आव्हानही सचिन अहिर यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले आहे.
आज भाजपचे नेते आशिष शेलार हे राज ठाकरे यांनी शिवशेर्थावर भेट घेतली त्यामुळे मनसे भाजप परत युती होणार का अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे. त्यावर सचिन अहिर म्हणाले,युती करण्याची गरज नाही .त्यांची छुपी युती आधीपासून असल्याचे त्यांनी सांगितले. हे आज झालेले नाही.
भाजपासाठी मनसेने आधीपासूनच मशिदीसमोर भोंगे वाजवण्याची भूमिका घेतली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
राज ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी कधी विनोद तावडे तर कधी आशिष शेलार हे शिवतीर्थावर जात असल्याची सचिन अहिर यांनी टीका केली.
दसरा मेळाव्यात मनसेने पण उडी घेतली आहे.शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे. आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे. त्यावर सचिन अहिर म्हणाले, संदीप देशपांडे असतील किंवा मनसेचे नेते असतील. ते शिवाजी पार्क लाच राहतात. त्यांनी चांगल्या मनाने अधि आमचे विचार ऐकावेत. पूर्ण भाषण ऐकावे. आमचे पक्षप्रमुख काय बोलतात हे ऐकावे. असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार यांना गंभीर इशारा दिला आहे. दापोली येथे अनिल परब यांचं असलेलं साई रिसाॅर्ट हे अनाधिकृत स्मारक गणेश उत्सवानंतर पाडण्यात येणार असल्याचा गंभीर इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यावर सचिन अहिर म्हणाले, कायदा आपलं काम करेल. काही लोक भविष्यवाणी करतात मी त्यांच्याकडे जाऊ इच्छित नाही. वैयक्तिक स्तरावर जाऊन आज या गोष्टी केल्या जातात. त्याला काही महत्त्व देण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading