सोनिया गांधीं यांच्याबाबत केलेल्या ट्विट प्रकरणी अतुल भातखळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
पुणे: भाजप नेते अतुल भातखळकर यांच्या विरोधात पुणे सायबर पोलीसांनी सोनिया गांधींची बदनामी केल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींना इडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सुरुवातीला सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले असता त्यांना कोरोना झाल्याचे कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते.
त्या प्रकरणावर अतुल भातखळकर यांनी त्यावर ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कोरोनाचा इ डी व्हेरिएंट असल्याच म्हणाले होतं. याबाबत पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल भातखळकर यांच्याविरोधात संदीप भुजबळ यांनी तक्रार दिली होती. ट्वीटरवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती. आता अतुल भातखळकर यांच्या पोलिसांकडून या पोस्टप्रकरणी चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
