Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

‘7व्या स्मार्ट अर्बनेशन परिषद 2022’ मध्ये पुणे स्मार्ट सिटीचा  “स्मार्ट अॅण्ड सक्सेसफुल सेफ्टी अॅण्ड सिक्युरीटी” पुरस्काराने सन्मान

पुणे : स्मार्ट सिटी कौन्सिल इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व स्मार्ट सिटी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (26 ऑगस्ट) रोजी मुंबई येथे ‘7व्या स्मार्ट शहरीकरण परिषद 2022 आयोजन करण्यात आले होते.
सदर परिषदेत स्मार्ट प्रोजेक्ट अवॉर्ड्स 2022 अंतर्गत भारतीय शहरांना अधिक राहण्यायोग्य,स्वावलंबी,सर्वसमावेशक, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनविणारे पथदर्शी प्रकल्प, कल्पना आणि धोरणे आणि भविष्यासाठी खूप मोठी संधी असलेल्या प्रकल्पाकरिता स्मार्ट सिटीज् तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पुरस्कार वितरीत करण्यात आले.
पुणे स्मार्ट सिटीने “स्मार्ट अॅण्ड सक्सेसफुल सेफ्टी अॅण्ड सिक्युरीटी” या श्रेणीमध्ये पुरस्कार पटकावला आहे. प्रताप पडोडे, संस्थापक आणि कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडिया यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.संजय कोलते (भा.प्र.से) यांनी हा पुरस्कार स्विकारला यावेळी प्रभारी मुख्य वित्त अधिकारी, तथा सह महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका उल्का कळसकर, मुख्य ज्ञान आधिकारी अनिरुध्द शहापुरे, कंपनी सचिव स्वानंद शेडे आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading