Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

पुणे स्मार्ट सिटीला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार 2022

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पाला सिल्व्हर पुरस्कार तसेच ऑर्डर ऑफ मेरीट पुरस्कार
पुणे : ८३ वी स्कॉच परिषद ऑनलाईन पद्धतीने पार पडली. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) पुणे स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पांला सिल्व्हर पुरस्कार मिळाला आहे. ऑनलाईन मीटिंगद्वारे पार पडलेल्या कार्यक्रमात पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते (भा.प्र.से) यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने सदर पुरस्कार स्वीकारला. कठोर निकष व मूल्यांकनातून पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाने हा लौकिक मिळवला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्कारांवर यंदा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) मोहोर उमटवली आहे.
‘स्टेट ऑफ गव्हर्नन्स’ या सदराखाली नुकतीच ८३ वी स्कॉच परिषद ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यामध्ये स्कॉच ग्रूपच्या वतीने या निवडीची घोषणा करून पीएससीडीएसलच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पाला सिल्व्हर पुरस्कार घोषित करून सन्मान देण्यात आला.
स्मार्ट इलिमेंट्स प्रकल्पाला स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट :- पीएससीडीसीएलच्या स्मार्ट इलिमेंट्स हा प्रकल्प इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर सह शहर प्रशासन आणि विविध विभागाना रिअल-टाइम डेटासह माहिती योग्य निर्णय घेण्यास सक्षम करते. शहरात स्थापित ७२० स्मार्ट इलेमेंटस हे महत्त्वाची माहितीचे स्रोत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी हंगामात पूर सेन्सरच्या सूचनांमुळे बचाव कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात मदत झाली. होम आयसोलेशन ट्रॅकिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, को-मॉर्बिड सर्वेक्षण, हॉटस्पॉट्स आणि कंटेनमेंट झोन निर्धारित करण्याच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी १५ वॉर्ड कार्यालयांसह 24×7 ऑपरेशन्सचे समन्वय करण्यासाठी आयसीसीसीला प्रमुख कोविड -१९ युद्ध कक्षात रूपांतरित केले गेले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading