Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

मैदानाची पूजा करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

पुणे : तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता क्रीडांगणावर, मैदानावर मुलांनी सतत खेळले पाहिजे ज्यायोगे त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होईल अशी भूमिका डी. ई.एस. प्रायमरी स्कूलने नेहमीच मांडली आहे. त्यानुसार आज (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांना मानवंदना देऊन डी. ई.एस. प्रायमरी स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा पारितोषिक विजेत्या  विद्यार्थ्यांच्या हस्ते मैदानाची पूजा केली गेली.

यावर्षी तायक्वांदो, रोप-मल्लखांब, मल्लखांब, एरोबिक्स अशा विविध खेळांची प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ शाळेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला तसेच पालक व शिक्षकांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी पर्यवेक्षिका ग्रेसी डिसोजा व सिमरन गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक योगिनी कानडे व श्रीकांत जोशी यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बरोबर घेऊन हा सोहळा उचलून धरला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading