गुलाबराव पाटील यांना त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता -डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे: राज्यात शिंदे व फडणीस सरकारचे पावसाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनामध्ये नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं. त्यावर विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, प्रत्येकाने अभ्यास करून बोलले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाने बोलताना व्यवस्थित बोलले पाहिजे.गुलाबराव पाटील आणि माझे काही वैर नाही . त्यांना कोणताही त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता.अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या व विधानसभेच्या उपसभापती
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पावसाळी अधिवेशन कामकाजाच्या संदर्भात सरकार परिषद घेऊन माहिती दिली तेव्हा त्यांनी पत्रकारां सोबत विविध मुद्द्यांवर संवाद साधला. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गुलाबराव पाटील हे मंत्री किंवा आमदार असतील त्यांनी विधानसभेत दिलेल्या नियमाचे पालन करून कामकाज केले पाहिजे. अशीच माझी अपेक्षा आहे.
शिवसेनेचे युवा नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गणेश उत्सवाच्या वेळी पुण्यातील पाच मानाचे गणपतीचे दर्शन घ्यायला येणार आहेत अशी माहिती समजली आहे. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या.आदित्य ठाकरेंचा पुणे दौरा अजून ठरलेला नाही. जेव्हा तो दौरा ठरेल. त्यावेळेस आमच्या पक्षाचे प्रवक्ते बोलतील. आणि त्याआधी तो दौरा तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल आमचा दौरा हा जाहीर असेल. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यावरून विरोधाकांकडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनीही तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. नीलम गोऱ्हे यांनी पण शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे दोऱ्यावरून घर ते कार्यालय किंवा कार्यालय ते घर नसेल असं सांगत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी तानाजी सावंत यांच्या दौऱ्यावर टोमणा मारला आहे.
काही दिवसांपासून भाजपा नेते मोहीत कंबोज महाविकास आघाडीतील नेतेमंडळींवर सात्याने टीका करत असताना पाहायला मिळाले. दरम्यान, आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्या दिशेने वळवला असल्याचे दिसत आहे.
मोहीत कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांना लक्ष्य करत आज सकाळी एका पाठोपाठ तीन ट्वीट केले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांनी रोहीत पवार यांचे नाव घेतले . त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या.भाजपचे नेते मोहित कंबोज ट्विट करून जे आरोप करत आहेत त्याचे उत्तर न्यायालय देईल पण काही लोक न्यायालयात काय होणार आहे हे सांगून स्वतःचा मोठेपणा घेत असतील तर तो त्यांचा दोष आहे अशी टीका देखील त्यांनी मोहित कांबोज यांच्यावर केली आहे. मोहित कांबोज हे कायदा धाब्यावर बसवून असे स्टेटमेंट देत असतील तर न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे
