Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

पाषाण तलावातील परिसरात ‘ती’ बंदी अखेर आज उठवली

पुणे : पाषाण तलावाच्या उद्याना बाहेरील वादग्रस्त बोर्ड अखेर हटविण्यात आला आहे. ‘कपल इज नॉट अलाऊड’ असा आशय असलेला बोर्ड उद्यानाच्या बाहेर लावण्यात आलेला होता. पाषाण तलावातील परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी घालण्यात आली होती. ती बंदी अखेर आज उठवण्यात आली आहे. सर्व स्तरातून होणारा निषेध पाहता पुणे महापालिकेने तो फलक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती याचिका दाखल करणारे राईट टू लव्हचे वकील विकास शिंदे यांनी माहिती दिली.
विकास शिंदे म्हणाले,येथे भेट देणाऱ्यांना पक्षीनिरीक्षणात होत असलेला अडथळा तसेच सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेने याठिकाणी अविवाहित जोडप्यांना प्रवेश निषिद्ध केला होता. हा आदेश तसेच काढण्यात आलेला फतवा पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असा अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर महापालिका एक पाऊल मागे आली आहे. असे विकास शिंदे म्हणाले.
परिसर अत्यंत विस्तीर्ण आणि दाट झाली असलेला आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा परिसर पुरेसा सक्षम नाही. सुरक्षारक्षक अत्यंत कमी आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये केवळ एकच सुरक्षारक्षक काम करत असल्याचे दिसून आले आहे. अविवाहित जोडप्यांमुळे त्रास होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे होते. त्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेने हा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. याचे विविध संघटनांनीही स्वागत केले आहे. असे विकास शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading