शिवसेना संभाजी ब्रिगेड युती शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न. हेतू आणि निष्पत्ती काय हे मला माहित नाही -चंद्रकांत पाटील
पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात नव्या राजकीय समीकरणाच्या नांदीची सुरूवात होत आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उपस्थित होते. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यावर आज पुण्यातील पत्रकारांशी भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची खड्ड्या व विविध प्रश्न संदर्भात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले,शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न. हेतू आणि निष्पत्ती काय हे मला माहित नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून त्यावर
सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,भारतीय घटनेनुसार चौकशी सुरू असते. याबाबत माझ्या सारख्या व्यक्तीने बोलणं उचित नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार व शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुणे द्वारा वायरल झाला सोशल मीडियावर हा दोरा टोल झाला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, तानाजी सावंत यांचा कोणता दौरा व्हायरल झालाय, याबाबत मी माहिती घेतो. अन मग प्रतिक्रिया देतो. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
