Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

मानाच्या सात मंडळाकडून मोरया कार्यकर्ता मंचाची स्थापन

कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गणेश मंडळांचे पाऊल : गणेशोत्सव दारू व प्लास्टिकमुक्त साजरा करणार

पुणे / प्रतिनीधी : प्रत्येक मंडळांच्या गणेश कार्यकर्त्यांसाठी आर्थिकदृष्ट्या रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शहरातील अष्टविनायक मंडळापैकी सात मंडळांच्या वतीने गणेश कार्यकर्त्यांसाठी ‘मोरया कार्यकर्ता मंचाची’ स्थापना करण्यात आली आहे. त्याबरोबरीने या वर्षीचा गणेशोत्सव हा दारू व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील मानाच्या सात गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कसबा गणपतीचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरीचे नितीन पंडीत, केशव नेऊरगावकर, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, केसरीवाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन आदी मान्यवर उपस्थित होते.

मानाच्या सात मंडळांनी एकत्रितपणे येवून मोरया कार्यकर्ता मंचाची स्थापना करण्यात आली आहे. गणेश कार्यकर्ता हा प्रत्येक मंडळाचा गाभा असतो. गणेशोत्सव केवळ १० दिवसांचा असला तरी देखील त्यासाठी कार्यकर्ता वर्षभर झटत असतो. अशा कार्यकत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोरया मंचाच्या वतीने सुमारे २ ते ५ लक्ष रुपयांची कर्ज व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी विविध बँकासोबत बोलणे सुरू आहे. यातून रोजगार निर्मिती होवून देशाच्या आर्थव्यवस्थेत खारीचा वाटा उचलण्याचा आमचा मानस आहे अशी भावना सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पुण्यात निर्माण होते ते देशात, जगात विकते जाते. यापूर्वी पुण्यात गणेश मंडळांनी हौदात गणेश विसर्जन, निर्माल्य संकलन असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत ज्यांचे अनुकरण इतर ठिकाणी देखील झाले आहे. शासन, प्रशासन एकत्र येऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने समाजाभिमुख उत्सव अगदी दैदिप्यमान होईल यासाठी पूर्वी पासून प्रयत्न झाले तीच परंपरा आम्ही पुढे नेत आहोत, अशी भावना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी व्यक्त केली.

असा होणार गणेशोत्सव
कसबा गणपती :
प्राणप्रतिष्ठा : क्रांतिकारक राजगुरू यांच्या परिवाराच्या हस्ते
विविध उपक्रमांचे आयोजन

तांबडी जोगेश्वरी :
प्राणप्रतिष्ठा : मीरा व मिलिंद अनंत काळे, अध्यक्ष कॉसमॉस बँक
देखावा : गुढीपाडवा (२ दिवस), महाशिवरात्र (२ दिवस)
वारी (२ दिवस), आषाढी (२ दिवस), दिवाळी (२ दिवस)
संवादमाला तिसरे वर्ष : प्रमुख वक्ते : अविनाश धर्माधिकारी, निपुण धर्माधिकारी, आनंद देशपांडे, जनकल्याण समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक आदी.

गुरुजी तालीम
प्राणप्रतिष्ठा : सौ. जान्हवी व पुनीत बालन
उपक्रम : मयूर रथ मिरवणूक
गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी : २४ तास सीसीटीव्ही व कार्यकर्ते

तुळशीबाग मंडळ :
प्राणप्रतिष्ठा : तुळशीबाग चौकात पुनीत बालन यांच्या हस्ते
उपक्रम : गणेश याग व अभिषेकची विनामूल्य सेवा
रोज विविध सेलिब्रिटींच्या हस्ते आरती व. त्याचे फेसबूकच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण
सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती
आरोग्य सेवा केंद्र व अँब्युलन्स २४ तास उपलब्ध

केसरीवाडा गणपती :
उपक्रम : मनोरंजनाचे कार्यक्रम
८ तारखेला पानसुपारी चा कार्यक्रम

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी :
प्राणप्रतिष्ठा : चंद्रकांत दादा पाटील
देखावा : स्वामीनारायण मंदिर अक्षरधाम
विविध उपक्रमांचे आयोजन

मंडई मंडळ :
प्राणप्रतिष्ठा : प्रतापकाका गोगावले
देखावा : स्वप्ननगरी महाल
मंडळाचे आवाहन : भक्तांनी १ वही-पेन अर्पण करावा, जेणेकरून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ही मदत पोचविता येईल…!!
_————–

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading