विद्यापीठातील डॉ.स्नेहा सगरकर यांना इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सची असोसिएशनशीप
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. स्नेहा सगरकर डीएसटी इन्स्पायर फॅकल्टी यांना ‘इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस’ च्या प्रतिष्ठित सहयोगी पदाने सन्मानित करण्यात आले आहे. काही प्रमुख विद्यापीठांना हा सन्मान मिळाला असून त्यापैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक आहे.
इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना सर सी.व्ही.रामन यांनी १९३४ मध्ये केली होती. देशाच्या वेगवेगळ्या भागातील व संस्थांमधील तरुण शास्त्रज्ञांना संधी देण्याच्या हेतूने १९८३ साली याची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्यामातून वेगवेगळ्या उपक्रमावर ही तज्ज्ञ मंडळी काम करतात. यासाठीचे नामांकन अकादमीचे सहकारी किंवा संस्था/विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याकडून केले जाते.
संशोधन त्यांची गुणवत्ता कामाची गुणवत्ता हे निवडीचे निकष असतात. या असोसिएटशिपची मुदत 3 वर्ष असून या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली, असे डॉ. स्नेहा सगरकर यांनी सांगितले.
