कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळांचा आम्हाला सार्थ अभिमान – रांका
पुणे : कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपून समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळांचा प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने पुण्यातील व पुणे जिल्ह्यातील १०२ मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक ओमप्रकाश रांका, रणजित जगताप ( युवक प्रदेशध्यक्ष अ भा म महा संघ ), करिष्मा शेख (पोलीस अधिकारी), सुनील मुचंडे, (पोलीस अधिकारी), अर्चना शाह – भिवरे पाटील – कार्याध्यक्षा, ( प्रतिभा नारी परिवर्तन संस्था प्रदेश अध्यक्षा ), राजू मोहिते (संस्थापक अध्यक्ष – प्रतिभा नारी परिवर्तन संस्था), शैला मुजुमले मंदाकिनी देशमुख, रुपाली क्षीरसागर, सोनाली वैद्य आशा उजागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना ओमप्रकाश रांका म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे प्रत्येकाने अनुकरण केले पाहिजे. कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपून समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळांचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटला.
रणजित जगताप म्हणाले की प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेचे राजू मोहिते यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पुण्यातील व पुणे जिल्ह्यातील १०२ मंडळांना पुरस्कार देऊन केलेला गौरव कौतुकास्पद आहे. युवक प्रदेशध्यक्ष अ भा मराठा महा संघाच्या नात्याने मी त्यांच्या पाठीशी उभे आहे.
अर्चना शहा म्हणाल्या की अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्ताने तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आम्ही आयोजन केले होते. राजू मोहिते म्हणाले की या सोहळ्याला पुण्यातील २०० पेक्षा जास्त मंडळांनी सहभाग नोंदवला होता. मात्र आम्ही १०२ मंडळांची निवड केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित रणदिवे यांनी केले तर आभार प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या सचिव सिमरन सय्यद यांनी केले.
