नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांकडून महिलेस अमानुष मारहाण; पोलीस उपनिरीक्षकवर कारवाई
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कडून प्रकरणाची दखल
मुंबई/नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यातील महिलेस पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील प्रकार सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी या प्रकरणाबाबत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली. पोलीस यंत्रणा ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असते. मात्र हेच पोलीस जर गुंडांसारखी अमानुष मारहाण करत सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत असतील तर अश्या पोलिस यंत्रणेतील कर्मचारी व अधिकारी यांना दडपशाही मुळे निर्माण झाला आहे. यासंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी सदरील प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
सदरील प्रकरणात डॉ.गोऱ्हे यांच्या निर्देशानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल पैसाने यांनी केलेल्या महिलेला मारहाण बाबत पैसाने पोलीस उप निरीक्षण याची कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर पैसाने यांची विभागीय चौकशी सुरू केली असून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात आली आहे.
