राज ठाकरे यांनी पत्रकारांशी केली ऑफ कॅमेरा चर्चा
पुणे: काल विधान भवनाच्या परिसरात सत्ताधारी त्यातही शिंदे गटाचे आमदार आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात धक्काबुक्की आणि त्यानंतर दोन्ही बाजूंकडून झालेला गोंधळ महाराष्ट्राने पाहिला. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही यूपी-बिहारकडे वाटचाल असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात मनसे सदस्य नोंदणीला सुरूवात झाली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. तेव्हा ते बोलत होते. प्रभाग रचनेवरून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले,प्रभाग रचना तीन किंवा चारचा केल्यामुळे काम करण्यास अडचणी येतात. प्रभागातील सदस्य संख्या वाढवण्याचे काम पहिल्यांदा राष्ट्रवादीने केले. असा आरोप त्यांनी राष्ट्रवादी वर केला.
राज ठाकरे म्हणाले, प्रभाग रचना सातत्याने बदल्याने नगरसेवकांना काम करता येत नाही. अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
