Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

PMP – विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा वार्षिक पास आता सर्व पास केंद्रांवर उपलब्ध

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे पास दि. ०७/०७/२०२२ पासून महामंडळाकडून नव्याने वार्षिक पास रूपये ५,०००/-, सहामाही पास रूपये ३,०००/- व त्रैमासिक पास रूपये २,०००/- असे पास सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहामाही पास रूपये ३,०००/- व त्रैमासिक पास रूपये २,०००/- यांची विक्री महामंडळाच्या पास केंद्रावर सुरू करण्यात आली आहे. फक्त वार्षिक पास रूपये ५,०००/- याची विक्री पुणे महानगर परिवहन महामंडळ, स्वारगेट, पुणे येथील पास विभागातून करण्यात येत होती. परंतु विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व सदरचे पासेसचा जास्तीत जास्त खप होण्यासाठी दि. २३/०८/२०२२ पासून परिवहन महामंडळाकडून सर्व पास केंद्रांवर रूपये ५,०००/- किंमतीचे वार्षिक पास विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तरी त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेवून परिवहन महामंडळास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी संपर्क क्र.: ०२०-२४५४५४५४

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading