Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त रुद्रयाग

पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे श्रावणी सोमवारनिमित्त रुद्रयागाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, प्रिया गाडवे, अथर्व गाडवे यांनी सहकुटुंब रुद्रयाग व होमहवन केले. यानिमित्ताने दत्तमहाराजांच्या मूर्तीला व मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, संगिता पिसाळ, माजी अध्यक्ष सुनिल रुकारी, शैला रुकारी, विश्वस्त राजू बलकवडे, हेमलता बलकवडे आदी उपस्थित होते. अमोल मुळे गुरुजी व सहका-यांनी रुद्रयागाचे पौरोहित्य केले.

दत्तमंदिर ट्रस्टतर्फे श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये अभिषेक, दत्तयाग, पवमान अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading