fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

लघू उद्योजकांना नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याची संधी

विद्यापीठातील रिसर्च पार्क फाऊंडेशनतर्फे प्रयोगशाळा भेट व चर्चासत्राचे आयोजन

पुणे : छोटे व्यावसायिक, लघू उद्योजक यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, आपल्या उद्योगासाठी कोणते तंत्रज्ञान वापरावे याची माहिती देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ‘लघू उद्योग भारती’ व ‘लेक्सीकॉन सेंटर ऑफ एमएसएमई एक्सलन्स’ च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विद्यापीठातील तसेच बाहेरील स्टार्टअप ना मार्गदर्शन करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून आज (मंगळवारी २३ ऑगस्ट ) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद शाळिग्राम व संजू नायर ‘व्यवसायाची स्थिरता व प्रगती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

केंद्र सरकारच्या लघू व मध्यम उद्योग धोरण ४.० च्या सुरू करण्यात आलेल्या समर्थ भारत उद्योग प्रकल्पाच्या सीफोरायफोर प्रयोगशाळेलाही उपस्थितांना भेट देता येणार आहे. या प्रयोगशाळेत देशविदेशात चालणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा वेध घेतला जातो व त्यामध्यामातून भारतातली लघू उद्योजकांना मार्गदर्शन केले जाते.

हा कार्यक्रम सर्व उद्योजकांसाठी निःशुल्क असून जास्तीत जास्त लघू व मध्यम उद्योजकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ मार्फत करण्यात आले आहे.  ” and ‘x’ at 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading