Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘थोरले बाजीराव पेशवे’ नावाने नामांतर करावे – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

पुणे : पारंपरिक खेळ, फुगड्या, पारंपरिक वेषात नटलेले थोरले बाजीराव पेशवे, काशीबाई पेशवे व पेशवे कालीन पोषाखातील महिलांच्या सहभाग असलेली भव्य दुचाकी अभीवादन रॅली आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने काढण्यात आली. निमित्त होते थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणेच्या वतीने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘थोरले बाजीराव पेशवे’ नावाने नामांतर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आज सकाळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणेच्यावतीने आयोजित अभिवादन रॅलीची सुरवात कोथरूड येथील छत्रपती शिवाजी पुतळा येथून सकाळी 9 वाजता झाली व समारोप शनिवारवाडा येथे झाला. या कार्यक्रमासाठी खास बीड वरून महिला पदाधिकारी आल्या होत्या व आपल्या भावना त्यांनी कवितेतून व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हाअध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते. कार्यक्रमाला केतकी कुलकर्णी (महिला आघाडी अध्यक्षा), वृषाली शेकदार, विजय शेकदार, रसिका जोशी, कमलेश जोशी, विकास अभ्यंकर, राजेश सहस्त्रबुद्धे,सचिन टापरे कुंदनकुमार साठे, सचिन बोधनी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
2 Attachments

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading