Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

सारंग सराफ यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय – अमित ठाकरे


पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग आनंद सराफ यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री. अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंवाद अभियाना अंतर्गत मेळाव्यात नेते अमित ठाकरे यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य सारंग आनंद सराफ यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन अमित ठाकरे यांनी केले.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले तरुणांनी राजकारणात येणे गरजेचे आहे. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अडचणी वर ठाम भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत अश्या विद्यार्थ्यांवर काम होणे गरजेचे आहे असे मला वाटते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading