कोल्हापूरच्या जामदारची अल्टिमेट खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी
कोल्हापूरातील इचलकरंजी येथील जामदारच्या खेळाचा राजस्थानला जरुर दिलासा मिळाला. मात्र, सहकाऱ्यांकडून फारशी चांगली साथ न मिळाल्याने सांघिक कामगिरीत राजस्थानला मागे रहावे लागले आहे.
जामदारची कामगिरी राजस्थानसाठी महत्वाची ठरत असली, तरी त्यांना अजून विजयाची प्रतिक्षा आहे. आजच्या विश्रांतीनंतर आता उद्या तेलुगु योद्धाजविरुद्ध ते मैदानात उतरतील तेव्हा निश्चितच त्यांचा विजयासाठी प्रयत्न असेल यात शंका नाही.
अल्टीमेट खो खो स्पर्धेत चेन्नई क्विक गन्स, गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडीज, ओडिशा जुगरनट्स, राजस्थान वॉरियर्स, तेलगु योद्धाज या सहा संघांचा समावेश आहे.
रविवारी, गुण तालिकेत आघाडीवर असलेल्या गुजरात जायंट्स संघ ओडिशा जुगरनट्स संघाशी सामना करणार आहे.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
