Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

दहीहंडीला खेळाचा दर्जा; गोविंदांना शासकीय नोकरी – मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. यामुळे कबड्डी, खो-खो, मल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही खेळा प्रकारात समावेश झाला आहे. दरम्यान, स्पेन व चीन या देशांमध्ये यापूर्वीच मानवी मनोरे (पिरॅमिड) म्हणून या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आला आहे. 

आज मुख्यमंत्र्यांनी ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा घेण्याची ही घोषणा केली. तसेच या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर राज्य सरकारने गोविंदाना नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा देखील लाभ मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading