नवभारत मानवतावादी संस्था व शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनी विविध उपक्रम
पुणे : नवभारत मानवतावादी संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिनी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व संस्थेच्या द्विशतकपुर्ती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत .
गरजू मुलांना साहित्य वाटप, पारितोषिक वितरण, कोरोना योध्यांचा सत्कार, शहिद कुटुंबियांचा सत्कार, वृक्षारोंपण, 250 रोपांचे वाटप, अनाथाश्रम व दुर्गम भागातील पुरग्रस्तांना मदत असे उपक्रम आयोजित करण्यात आले. गुळुंब, जोरवाडी, ससून, बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे सिद्धीविनायक सांस्कृतिक ट्रस्ट, कात्रज अशा विविध ठिकाणी हे कार्यक्रम पार पडले.
यावेळी अधिष्ठाता, डाॅ. विनायक काळे, उप अधिष्ठाता डॉ समीर जोशी, डॉ राजेश कारकर्ते, डाॅ तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ दासवानी, मुख्य प्रशासकीय अधिकारी गणेश बडदरे व डाॅक्टर्स व कर्मचारी विशेष योगदानाबद्दल गुलाब पुष्पगुच्छ व रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. प्रकाश भिलारे, महादेव पवार, महेश जाधव, संतोष भांदिर्गे, अरबुणे मॅडम, जितेंद्र भिलारे, रमेश भोजने यांनी संयोजन केले.
