Monday, September 7, 2026
Latest NewsPUNE

लिला पुनावाला फाउंडेशनकडून शालेय मुलींना शिष्यवृत्ती; गुणवंत मुलींचा सन्मान

पुणे : गेल्या महिन्यात ७ व्या इयत्तेतील २३० हून अधिक शालेय मुलींना शिष्यवृत्ती दिल्यानंतर आता लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने पुणे शहर ,गावडेवाडी, चांदोली, खिडकी आणि पिंपळगाव या शाळांतील ८वी इयत्तेतील २१५ हून अधिक गुणवंत परंतु आर्थिकरित्या दुर्बल शालेय मुलींना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. एलपीएफच्या ‘टूमारो टूगेदर’ या शालेय शिष्यवृत्ती प्रकल्पाचे हे १२ वे यशस्वी वर्ष असुन, हा प्रकल्प सुरू झाल्यापासून पुणे शहर आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील १५ शाळांमधील सुमारे २७०० शालेय मुलींना ७ व्या इयत्तेपासून ते पदवीपर्यंतच्या १० वर्षांच्या वचनबद्धतेसह शिष्यवृत्ती देण्यात आली आहे, जे या प्रकल्पाचे वेगळेपण आहे. यावेळी १० वी आणि १२ वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या फाउंडेशनच्या लिला ज्युनियर्स आणि लिला सीनियर्सना भरघोस यशासाठी ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यासोबतच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्कूल न्यूजलेटर ‘टूमारो टूगेदरच्या’ च्या ९ व्या अंकाचे लोकार्पण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहुन मुलींचा सत्कार करणाऱ्या पाहुण्यांमध्ये अभिनय कुंभार( इनकमटॅक्स कमिशनर-एक्जमशन्स), अमित तलरेजा (एव्हीपी-फायनान्स, ब्रोस इंडिया ऑटोमोटिव सिस्टम्स प्रा.लि) यांच्यासोबत एलपीएफ मधील इतर सहभागी मध्ये लिला पुनावाला( अध्यक्षा व संस्थापक विश्वस्त), फिरोज पुनावाला ( संस्थापक विश्वस्त), विनिता देशमुख (बोर्ड ऑफ ट्रस्टी) आणि प्रिती खरे (सीईओ एलपीएफ) उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे अभिनय कुंभार यांनी एलपीएफच्या संस्थापिका लिला पुनावाला आणि फिरोज पुनावाला यांनी मुली आणि समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचे व अथक प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की , हे दोघेही देवाचे हात आहेत. शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्या मुली आणि त्यांच्या पालकांशी देखील त्यांनी प्रेरणादायी भाषणाद्वारे संवाद साधला आणि त्यांना शिक्षण व सक्षमीकरणाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले. याचबरोबर सन्माननिय पाहुणे अमित तलरेजा यांनी एलपीएफ सोबतच्या त्यांच्या सीएसआर उपक्रमातील ३ वर्षांच्या भागीदारीबद्दल अभिमान आणि आनंद व्यक्त केला

यावेळी लिला पुनावाला आणि फिरोज पुनावाला म्हणाले, “आम्ही पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि या मुलींची शिक्षणाची आणि करिअरची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नेहमिच आमंत्रित करतो”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading