दहीहंडी साजरा करण्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी द्यावी -दहीहंडी समन्वय समिती
पुणे: कोरोना मुळे दोन वर्ष राज्यात दहीहंडी व गणपती उत्सव मंडळांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. कोरोना हा कमी झाल्यानंतर राज्यात आलेल्या नवीन सरकारने या वर्षी दहीहंडी साजरा करण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. यावर्षी राज्यात दहीहंडी हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्यावर राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी शेवटचे चार दिवस देखावे व स्पीकर साठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला रात्री अकरा वाजेपर्यंत परवानगी द्यावी. अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत पुणे शहर दहीहंडी समन्वय समिती ने केली आहे.
या पत्रकार परिषदेला पुणे शहर दहीहंडी समन्वय समिती चे अध्यक्ष राहुल मस्के, अमित जाधव ,राम खरकुटे, अनिकेत शेलार उपस्थित होते.
राहुल मस्के म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यावर्षी दहीहंडीउत्सव साजरा करण्यासाठी राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल तसेच दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी सर्व निर्बंध शिथिल केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद . असे राहुल मस्के म्हणाले.
अनिकेत शेलार म्हणाले, राज्य शासन व पोलीस प्रशासन यांच्या नियमानुसार दहीहंडी साठी दोन स्पीकर ची परवानगी देण्यात येते परंतु पुणे सणामध्ये बाकीचे सर्व सण व उत्सव साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पीकर लावले जातात त्याप्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी जास्त स्पीकर लावण्याची परवानगी मिळावी. अशी मागणी अनिकेत शेलार यांनी केली.
