Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

गोपाळकृष्ण शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वरांजली वायदंडे,समीक्षा रेवडे,जीवन कुसाळकर ,अक्षता विडेकर,रूपाली कुऱ्हाडे,अंश प्रजापती या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे केली. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. विशाल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून ध्वज प्रतिज्ञा म्हणून घेतली. माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम,माजी नगरसेवक आदित्य माळवे, शिवसेना विभागप्रमुख प्रविण डोंगरे,व पत्रकार मित्र समाधान काटे, पत्रकार मित्र ज्ञानेश्वर मोरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमांकरिता शाळेतील शिक्षकांचे मान्यवरानी याप्रसंगी कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री कासार व रणजित बोत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गीतांजली कांबळे, दिपाली गावडे,मंदाकिनी बलकवडे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading