Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर रूपाली पाटील ठोंबरे यांचे ट्विट दिला फडणवीसांचा दाखला

पुणे : स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी घराणेशाहीवर सडकून टीका केली. तसेच घराणेशाहीचं राजकारण संपवण्याच्या लढ्यात आपल्याला साथ द्या.असं आवाहनही जनतेला केलं. मोदींच्या या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी फडणवीस कुटुंबाचा राजकीय प्रवासाचा दाखला दिला आहे.
रूपाली पाटील ट्विटमध्ये म्हणतात, घराणेशाही संपवणार आहात नरेंद्र मोदी साहेब. मग हे पाहा.गंगाधरराव फडणवीस (आमदार), शोभाताई फडणवीस (माजी मंत्री), देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) याचं काय? वाट पाहुयात आता. मोदी साहेबांना त्यांच्या पक्षातून आणि महाराष्ट्रातून सुरुवात कधी करताहेत याची. अशा आशयाचं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे. पतंप्रधानांच्या आवाहनाला मान देत फडणवीस राजीनामा देतील का? असा प्रश्नही रूपाली पाटील ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading