आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी अमित ठाकरे पक्ष बांधणीसाठी मैदानात
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता ते कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.
अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाची सुरूवात केली असून त्यांनी राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता ते तीन दिवस पुणे दौऱ्यावरयेणार आहेत. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान ठाकरे हे पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यामध्ये ते महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. तसेच ठाकरे हे या दौऱ्यादरम्यान सगळ्या मतदार संघात जाऊन पक्ष बांधिलकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
अमित हे पुण्यातील ८ आणि शिरूर मधील ५ मतदारसंघात जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. १२ ऑगस्टला अमित हे कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी करणार दौरा करणार असून १३ तारखेला पर्वती, हडपसर, पुरंदर,, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघाचा दौरा करणार आणि १४ ऑगस्टला अमित ठाकरेंता शिरूर, चाकण आणि खेड मध्ये दौरा असणार आहे. आदित्य ठाकरे जसे शिव संवाद यात्रे मार्फत कार्यकर्त्यांची संवाद साधत आहेत .तसेच अमित ठाकरे पण हे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान काढून कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.