बसपाच्यावतीने भ्रष्टाचार मुक्त संकल्प व भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे 12 तारखेला आयोजन
पुणे : भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड समूळ नष्ट करण्यासाठी बसपाच्या वतीने भ्रष्टाचार मुक्त पुणे चा संकल्प व भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन १२ऑगस्ट रोजी येरवडा येथीलअण्णाभाऊ साठे सभागृह येथे दुपारी १ वाजता करण्यात आले असल्याचे बसपा महाराष्ट्र प्रभारी हुलगेश चलवादी यांनी सांगितले.
सामान्य माणूस कोणतेही काम घेवुन ,पुणे मनपा ,पिंपरी चिंचवड मनपा ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती याठिकाणी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय ,महावितरण कार्यालय ,तलाठी ऑफिस ,तहसील कार्यालय , शिक्षण संस्था ,सर्कल कार्यालय ,प्रांत कार्यालय , पोलीस ठाणे ट्रॉफीक पोलीस , भूमी अभिलेख ,धर्मादाय हॉस्पिटल ,सार्वजनिक बँका ,अन्नधान्य पुरवठा कार्यालय ,जातपडताळणी कार्यालय ,जमीन खरेडी विक्री कार्यालय ,ई -सेवा केंद्र ,रेल्वे परिमंडळ ,रस्ते विकास महामंडळ ,कामगार कार्यालय ,टोल नाका ,मेट्रो ,,सर्व प्रकारच्या परीक्षा विभाग , व अनेक सरकारी कार्यालयात गेले असता सरळ मार्गाने ते काम होत नाही सरकारी अधिकारी जसे काम तसे दाम ,जेवढे मोठे काम तेवढे जास्त पैसे घेतल्याशिवाय कोणतेही कामही करीत नाही. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे .यासाठी भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तसेच या निवडणुकीत भ्रष्ट राजकारणी मंडळींना घरी बसवले पाहीजे यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय महासचिव खासदार अशोक सिद्धार्थ, प्रदेश प्रभारी नितीनसिह, प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष ऍड.संदीप ताजने, महाराष्ट्र प्रभारी हुलगेश चलवादी करणार आहे .
