राठोडांच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते पुरेसे आहे -चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : आज 18 आमदारांचा शपथविधी झाला. यामध्ये बंडखोर आमदार संजय राठोड यांनीही शपथ घेतली. परंतु, यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे भाजप मध्ये नाराजी आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले,संजय राठोडांच्या विषयावर याआधीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते पुरेसे आहे. असे भाजपचे नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिंदे सरकारचा बऱ्याच दिवसापासून रखडलेला मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला आहे.यावेळी 18 आमदारांचा शपथविधी झाला. बाकीच्या आमदारांचा अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका केली आहे.मला अतिशय आनंद आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, सर्व सक्षम मंत्री आहेत, लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार.जे विनाकारण आरोप करत आहेत त्यांना हे उत्तर आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी अजून खाते वाटप झाले नाही. त्यावर बावनकुळे म्हणाले,खातेवाटप लवकरच केलं जाईल.वाट बघा. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
