Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त १० ऑगस्ट रोजी फेरफार अदालत

 

फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात – जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर १० ऑगस्ट २०२२ रोजी फेरफार अदालत आयोजित केली जाणार आहे.

नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी फेरफार अदालतीच्या वेळी फेरफार अदालतीशिवाय जनतेच्या इतर कामकाजामध्ये सातबारा मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरीत करण्याबाबतचे कामकाज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येवून जनतेच्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या सूचना आहेत. साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केलेले असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading