fbpx

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथालय दिन साजरा

पुणे  : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेत ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला. आजच्या मोबाईलच्या काळात विद्यार्थ्यांची पुस्तके वाचण्याची आवड कमी होत आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा उपयोग करून वाचन आणि चिंतनाची प्रक्रिया वाढविली पाहिजे, असे मत मुख्याध्यापिका दर्शना कोकरे यांनी व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. रंगनाथन यांची माहिती सांगितली, कविता व श्लोक सादर केले, नालंदा विद्यापीठ आणि विश्वकोशाची चित्रफित दाखविली आणि शहरातील महत्त्वाच्या ग्रंथालयांची माहिती दिली. मुख्याध्यापिका दर्शना कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक सुधीर विसापुरे, पर्यवेक्षिका अनिता भोसले, ग्रंथपाल ललिता गोळे, स्वाती यज्ञोपवीत, सुवर्णा बोरकर यांनी संयोजन केले

Leave a Reply

%d bloggers like this: