Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

स्वतंत्र दिनी महागाई च्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे निदर्शने आंदोलन

पुणे:- सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन युवा सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपब्लिकन कामगार सेनेच्या माध्यमातून जनहितार्थ जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्वतंत्र दिनी ,सकाळी ११वाजता. विभागीय आयुक्त (विधान भवन) पुणे कार्यालयावर पुणे शहर,पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलनात पुणे शहर,पिंपरी चिंचवड,पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत सदर आंदोलन संविधानिक लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनासह विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयास कळविण्यात आले आहे. 

देशातील आणि राज्यातील वाढलेली महागाई तसेच प्रामुख्याने सीएनजी ची सतत होत असलेली भाववाढ ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रिक्षा चालक मालक,टॅक्सी चालक मालक सीएनजी वर अवलंबून असणारे व्यावसायिक तसेच सीएनजी वर चालणारे सर्व प्रकारचे वाहने तसेच सीएनजी चारचाकी वाहनातून मालवाहतूक करणारे वाहन चालक व वाहन धारक हे वाढलेल्या भाववाढी मुळे त्रस्त झाले असून गोरगरीब नागरिकांचा दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाला असून सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये त्याचे परिणाम होत आहेत स्वयंपाक गॅस,पेट्रोल, डिझेल,कडधान्य, खाद्य पदार्थ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती मुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी जनतेचे जगण कठीण झाले आहे या भाववाढी च्या निषेधार्थ तसेच गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनेक प्रश्नांच्या मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे हे आंदोलन असणार आहे. 

सदर आंदोलनात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. विवेक बनसोडे, रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश शिवसरण,रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव राहुल भालेराव,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल म्हस्के, रिपब्लिकन कामगार सेनेचे, सेनेचे जिल्ह्या अध्यक्ष हनुमंत अण्णा पपुल,रिपब्लिकन कामगार सेनेचे शहर अध्यक्ष अक्षय भालेराव,रिपब्लिकन कामगार सेनेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष संतोष सपकाळ,इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होणार असून आंदोलनात पक्ष संघटनेचे असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार आहेत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading