अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडूनच बलात्कार
पुणे : येथील गुलटेकडी परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडूनच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधम शेजाऱ्याने या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून, धमकावून अत्याचार केले. इतकेच नव्हे तर या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून या नराधमाने मुंबई येथे तिला डांबून तिथेही तिच्यावर अत्याचार केले आहेत. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, १९ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. जेव्हा ती घरी परतली आणि कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन या नराधमाने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने तिचे अपहरण करून तिला मुंबईत ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. पोलिसांनी आरोपीवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
