धक्कादायक : कोथूर्णे गावातील बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला
पुणे : पवनानगर जवळील कोथुर्णे (ता. मावळ) गावातून एका सात वर्षीय चिमुकली काल (दी. 2) दुपारपासून बेपत्ता होती. अखेर आज (दी. 3) तिचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी तेजस उर्फ दाद्या महिपती दळवी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरा जनार्दन चांदेकर (वय 7) असे या चिमूकलीचे नाव आहे. काल मंगळवारी दुपारच्या सुमारास ती गावातील मंदिरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. गावातील नागरिकांसह तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. अखेर आज गावातीलच शाळेच्या पाठीमागे तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, सदर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
