पीएमपीएमएल कडून बाजीराव रोड आणि शिवाजी रोड मार्गे चार मार्ग पूर्ववत
– विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीक यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
– गुरुवार, दि. ४ ऑगस्ट २०२२ पासून ४ मार्ग पूर्ववत सुरु होणार
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या बाजीराव रोड/शिवाजी रोड वरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दि. २८ जुलै २०२२ पासून बाजीराव रोड/शिवाजी रोड मार्गे संचलनात असलेल्या
मार्गांमध्ये बदल करण्यात आला होता. बाजीराव रोडने जाणाऱ्या बसेस जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन कॉलेज
रोड मार्गे व शिवाजी रोडने येणाऱ्या बसेस येताना जंगली महाराज रोडने डेक्कन टिळक रोड मार्गे असा बदल प्रायोगिक
तत्वावर करण्यात आला होता. यामुळे ५०८ फेऱ्यांच्या मार्गात बदल झाला होता.
तथापि विशेषतः विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीक यांची होणारी गैरसोय लक्षात घेता पुणे महानगर परिवहन
महामंडळाकडून खालील तक्त्यात नमूद केलेले ४ मार्ग दि. ४ ऑगस्ट २०२२ पासून पूर्ववत म्हणजेच जाताना बाजीराव रोड
मार्गे व येताना शिवाजी रोड मार्गे संचलनात सुरु राहणार आहेत.
अ.क्र. मार्ग क्रमांक पासून पर्यंत
१ ११ मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव
२ ११ अ मार्केटयार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन
३ ११ क कात्रज ते पिंपळेगुरव
४ २९८ कात्रज गुजरवाडी ते चिंचवड गाव
वरील ४ मार्गांच्या जाताना बाजीराव रोडने व येताना शिवाजी रोडने अशा एकूण २८० फेऱ्या होणार आहेत. तसेच
मार्ग क्रमांक २ – स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर सुरु असलेल्या २४ पुण्यदशम बसेसच्या ७१४ फेऱ्या देखील आहे तशाच राहणार आहेत. त्यामुळे आता बाजीराव रोड व शिवाजी रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांची गैरसोय होणार नाही.
