Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबईः शिवसेनेचे ठाण्याचे नवे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघेंविरोधात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Rape case filed against Anand Dighe’s nephew Kedar Dighe) केदार दिघे हे दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच त्यांची ठाण्याच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली होती.

मुंबईतल्या एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघेंसह त्यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधातही पीडित महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. तसेच केदार दिघे यांनी पोलिसांत तक्रार देऊ नये म्हणून धमकावल्याचाही पीडित महिलेने आरोप केला असून, त्यांच्या विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading