उदय सामंत हल्ला प्रकरणी पोलिसांनी केली शिवसैनिकांना अटक
पुणे: राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे.त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे.
त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. यावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री तपास करुन कारवाई सुरू केली आहे, भारती विद्यापीठ पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे.
उदय सामत हल्या प्रकरणी कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल नोंद झाला होता. पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली, असं ट्विट संजय मोरे यांनी केले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर,चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांचा समावेश आहे.
