Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

पोलीस अधिकाऱ्याने झोपडपट्टीतील मुलांसाठी सुरू केला बॉक्सिंग क्लब

पुणे : झोपडपट्टीतील गरीब मुला-मुलींमध्ये क्रीडा संस्कृती रुजली पाहिजे, या उद्देशाने पोलीस अधिकाऱ्याने बॉक्सिंग क्लब सुरू करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. विकास जाधव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
झोन 4 चे पोलीस अधिकारी विकास जाधव यांनी बोपोडीतील कोकण प्रतिष्ठान येथे सुरू केलेल्या बॉक्सिंग क्लबचे उद्घाटन शिवसेनेचे संघटक गणेश शिंदे व छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, बॉक्सिंग चॅम्पियन अरुण मोरे, सिद्धार्थ शिंदे, तसेच बॉक्सिंग प्रेमी उपस्थित होते.

रामभाऊ जाधव यावेळी बोलताना म्हणाले, की झोपडपट्टीतील मुला-मुलींना विविध खेळांचे प्रशिक्षण मिळाले, तर ते भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. या मुलांमध्ये कौशल्य असते. पण त्यांना खेळाची साधने सहज उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी त्यांना झगडावे लागते. त्यातून बोटावर मोजता येतील, एवढेच खेळाडू चमकतात. मात्र, या मुलांना खेळाची साधने, मैदान उपलब्ध करून दिले, तर ते नक्कीच याचे चिज करतील. पोलीस अधिकारी विकास जाधव यांनी उपलब्ध करून दिलेल्या बॉक्सिंग क्लबमधून प्रतिभावंत निर्माण होतील, अशी अपेक्षाही रामभाऊ जाधव यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सिद्धार्थ शिंदे यांनी केले, तर आभार विकास जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading