Pune – हडपसर मधील वादग्रस्त उद्यानाला आता आनंद दिघे यांचे नाव
पुणे : हडपसर येथील उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पहिले दिले जाणार होते. मात्र, करण्यात येणारे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आले आहे. शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचे निश्चित केले होते. वादानंतर संबंधित उद्यानाला धर्मवीर आनंद दिघेंचे नाव देण्यात येणार आहे .अशी माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उदय सामंत म्हणाले, उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते होणार आहे. या उद्यानाच्या संध्याकाळपर्यंत प्रशासकीय पातळीवर नामांतराच्या तरतुदी पूर्ण करणार. उद्यान सामान्य नागरिकांसाठी आहे इथे काय नाना भानगिरे सकाळ संध्याकाळ बसणार नाहीत . असे उदय सामंत म्हणाले.
या उद्यानाच्या नामांक करणा च्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. त्यावर उदय सामंत म्हणाले,मुख्यमंत्री कुठल्याही गैरकानुनी प्रकल्पांचे उद्घाटन करत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे गेल्या 3 4 दिवसांतील दौरे पाहून विरोधकांना पोटसुळ उठला आहे त्यामुळे या उद्यानाच्या मुद्द्याला त्यांनी राष्ट्रीय मुद्दा केला आहे. असे उदय सामंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय पातळीवर काही निर्णय घ्यायचा अधिकार असतो. एकनाथ शिंदे त्यांनी कुठलाही निर्णय घेतला .तरी विरोधी पक्ष सतत टीका करत आहेत. त्यावर उदय सामंत म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात आणि कार्यकर्त्यांच्या भावना जपणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या प्रशासक राज्य असल्याने प्रशासकीय पातळीवर रात्रीपर्यंत काही निर्णय होऊ शकतात. असे उदय सामंत म्हणाले.
